Daksh Police Times
चांदूरबाजार-अमरावती मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू ..मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश.
- By पुणे प्रतिनिधी --
- Sunday, 21 Apr, 2024 --
- View : 145
अमरावती : – शनिवारी (दि.20) दुपारी चांदूरबाजार-अमरावती मार्गावर बोराळा गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. हा . मिळालेल्या माहितीनुसार, शरद जनबंधू असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते ब्राह्मणवाडा थळी पोलीस स्टेशन येथे चालक पदावर कार्यरत होते. चांदूरबाजार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेल्वे क्रॉसिंग पासून काही अंतरावरच दोन्ही दुचाकींची समारोसमोर धडक झाली.
अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही दुचाकीवरील चालक घटनास्थळीच ठार झाले.
बुलेटस्वार (एम एच 27 डीजी 5332) पोलीस कर्मचारी शरद जनबंधू हे आपल्या घरी अमरावती येथे जात होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या टीव्हीएस दुचाकी (एमएच 27 सीडी 3385) गाडीची धडक जनबंधू यांना बसली.